Saturday, April 20, 2024

/

‘हेरवाडकर सह मेरी झेवीयर्स आणि पॉलची उपांत्य फेरीत धडक’

 belgaum

टिळकवाडी येथील लेले मैदानावर सुरू असलेल्या रॉयस्टन गोम्स फुटबॉल स्पर्धेत एम व्ही हेरवाडकर,सेंट मेरी,सेंट झेवीयर्स,सेंट पॉल संघाने प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात सेंट पॉल संघाने इस्लामिया संघाचा 1-0 गोल फरकाने पराभव केला.दोन्ही बलाढ्य संघात ही अटीतटीची लढत झाली सेंट पॉलच्या विहान किटवाडकर यानें एकमेव विजयी गोल केला.

दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात हेरवाडकर स्कुलने फिनिक्स पब्लिक स्कुलचा1-0 ने पराभव केला हेरवाडकर शाळेच्या कृष्णा मुचंडी याने विजयी गोल करत आपल्या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला.तिसऱ्या सामन्यात सेंट झेव्हीयर्स संघाने ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेचा 4-0 गोल फरकाने पराभव केला. रेहान किल्लेदार दोन गोल तर स्पर्श देसाई आणि झीशान कित्तुर यानें एकेक गोल केले.

चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात सेंट मेरी शाळेने संत मीरा शाळेला 6-0 गोल फरकाने नमवले.सेंट मेरीच्या आर्यन बिरजे याने हॅटट्रिक गोल,अभिषेक चिंनबाबू याने दोन तर आदित्य चव्हाण याने एक गोल केला.

उद्या दुपारी 2:00 वाजता सेंट पॉल विरुद्ध सेंट मेरी यांच्यात पहिला सेमी फायनल तर 3:30 वाजता सेंट झेव्हीयर्स विरुद्ध हेरवाडकर यांच्यात दुसरा सेमी फायनल मॅच होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.