बेळगावात अनेकांना लुटलेली हनी ट्रॅप गँग अटकेत

0
 belgaum

मुलींचा फोटो दाखवत तिच्या सलगी करायला लावत एकांता मधील व्हीडिओ फोटो दाखवत पैश्याच्या मागणीसाठी घरी बोलवत दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांच्या हनी ट्रॅप गँगला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे.

तीन महिला व चार युवकांनी मिळून तरुणांना हनी ट्रॅपद्वारे जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे उघड झाले आहे.विद्या उर्फ सारिका पांडुरंग हवालदार, दीपा संदीप पाटील (दोघीही रा. महाव्दार रोड, दुसरा क्रॉस), मंगला दिनेश पाटील (रा. कोरे गल्ली, शहापूर), मनोहर आप्पासाब पायकण्णावर (रा. हलगा), नागराज रामचंद्र कडकोळ (रा. देवराज अर्स कॉलनी, बसवनकुडची), सचिन मारुती सुतगट्टी (रा. सह्याद्रीनगर), महम्मदयुसुफ मिरासाब कित्तूर (रा. इटगी, ता. खानापूर)अशी सी सी आय बी पोलिसांनी अटक केलेल्या हनी ट्रॅप गँगची नावे आहेत.

bg
Honey trap
Honey trap gang arrest

पीडित युवकाने दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी महाद्वार रोड दुसरा क्रॉस येथील सारिका उर्फ विद्या हवालदार हिच्या घरी ट्रॅप मध्ये अडकवलेल्या कडून पन्नास हजार रुपये लुटण्याचा प्रयत्न करताना धाड टाकून रंगेहाथ पकडले आहे.मार्केटचे एसीपी एन. व्ही. भरमनी, गुन्हे तपास विभागाचे एसीपी महांतेश्वर जिद्दी यांच्या नेतृत्वाखाली सीसीआयबीचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे, मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. अत्यंत व्यवस्थीतपणे व नियोजबध्दरित्या ही टोळी कार्यरत होती. या टोळीच्या जाळय़ात बेळगाव परिसरातील अनेक जण अडकले असून टोळीतील गुन्हेगारांनी अक्षरशः त्यांची लुट केली आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून हा तरुण तरुणींच्या टोळीचा हा फसवणुकीचा फंडा व्यवस्थित चालला होता.बेळगाव पोलिसांनी हनी ट्रॅपद्वारे ब्लॅक मेलिंग करणाऱ्याचे जाळे उघडकीस आणले आहे.एखाद्या तरुणाला जाळ्यात ओढायचे आणि मौजमजा करण्यासाठी एखाद्या एकांत स्थळी बोलवायचे.तेथे एकांतात असताना तरुणीचे मित्र अचानक येऊन धाड घटल्यासारखे नाटक करायचे.तरुणाचे नको त्या अवस्थेतील फोटो,व्हीडिओ घेऊन नंतर त्याला ते उघड करण्याची धमकी देऊन ही तरुण तरुणींची टोळी पैसे उकळायची.तरुणाची ओळख करून घ्यायची.नंतर संबंध वाढवायचे आणि सावज आपल्यात गुरफटलय याची खात्री होताच भेटायला बोलवायचे आणि त्याचे फोटो,व्हीडिओ काढून घ्यायचे असा प्रकार सुरू होता.अखेर सी सी आय बी पोलिसांनी त्यांचा हनी ट्रॅप उघडकीस आणला आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.