दिवाळीच्या दिवसात किल्ला करण्याची परंपरा बेळगावहून ऑस्ट्रेलियात गेलेल्या इंजिनियरने जपली आहे.मेलबर्न येथील आपल्या घरात त्यांनी यावर्षी सिंधुदुर्ग मधील विजयदुर्गाची प्रतिकृती साकारले.
गेल्या पाच वर्षांपासून ऑस्ट्रेलियात किल्ला उभारण्याची परंपरा रोहित आंची यांनी सुरू केली आहे.बेळगावात असताना दिवाळीच्या दिवसात ते किल्ला करायचे.त्यामुळे त्यांनी मेलबर्न येथील आपल्या घरात किल्ला साकारायला सुरुवात केली.आता किल्ला करताना माझी दोन्ही मुलेही मला मदत करतात.किल्ला करताना शिवाजी महाराजांचा इतिहास,किल्ल्यांची माहिती मी मुलांना सांगतो.त्यामुळे आपल्या परंपरा आणि इतिहास पुढील पिढीला समजण्यास मदत होते असे रोहित आंची यांनी सांगितले.
मागील वर्षी देखील त्यांनी किल्ल्याची प्रतिकृ साकारत बेळगाव Live आयोजित किल्ला स्पर्धेत सहभाग घेतला होता यावर्षी देखील विजयदुर्ग किल्ला साकारत सात समुद्रापार त्यांनी परंपरा जोपासली आहे.
प्लास्टर आणि थर्मोकोलचा वापर करून किल्ला तयार केलाय.किल्ला तयार करण्यासाठी एक आठवडा लागतो.शिवाजी महाराज आणि मावळे भारतातून आणले आहेत अशी माहिती रोहित यांनी दिली.