belgaum

जांबोटी–कणकुंबी मार्गावर 14 हजार लिटर स्पिरिट जप्त

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात जांबोटी–कणकुंबी मार्गावर अबकारी विभागाने मोठी कारवाई करत 14 हजार लिटर अवैध मद्यसार (स्पिरिट) जप्त केले. मंगळवारी (दि. 19 मे) करण्यात आलेल्या या कारवाईत 35 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अबकारी विभागाला चॉकलेट रंगाच्या अशोक लेलँड कंपनीच्या सहा चाकी बँकर वाहनातून (क्र. KA-22 B-3793) विक्रीच्या उद्देशाने अवैधरित्या स्पिरिटची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून वाहन अडवण्यात आले. तपासणीदरम्यान वाहनातून 14 हजार लिटर मद्यसार आढळून आले.

या प्रकरणी वाहन चालक सिद्धराजू पुट्टस्वामी शेट्टी (वय 47, रा. हेग्गिनवाळू, ता. नंजनगुड, जि. म्हैसूर) याच्याविरुद्ध बीएनएसएस कायदा 2023 अंतर्गत कलम 35(3) नुसार नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपासासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. वाहन मालकाचा शोध सुरू असून त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जप्त करण्यात आलेल्या स्पिरिटची अंदाजे किंमत 14 लाख रुपये असून वाहनाची किंमत सुमारे 21 लाख रुपये आहे. एकूण 35 लाख 1 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 belgaum

ही कारवाई डॉ. वाय. मंजुनाथ, अबकारी आयुक्त (केंद्रीय कार्यालय, बेळगाव), एफ. एच. चलवादी, अबकारी संयुक्त आयुक्त (प्रशासन), तसेच जगदीश एन. के., अबकारी उपआयुक्त, बेळगाव (दक्षिण) जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

विजयकुमार जे. हिरेमठ यांच्या सूचनेनुसार रवी एम. मुरगोड यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकण्यात आली. कारवाईत मंजुनाथ मेळ्ळिगेरी, नुरुल्ला खान, सुनील एस. पाटील यांच्यासह अबकारी विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.