Sunday, May 5, 2024

/

काकती मध्ये शेतकरी महिलेचाअंगावर वीज पडून मृत्यू

 belgaum

विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात अंगावर वीज पडून एक शेतकरी महिला मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवार सायंकाळी 5 वाजता काकती शिवारात घडली.
सुशीला भावकान्ना कोळी (वय 37 रा. काकती, बेळगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

आज शनिवार सायंकाळपासुन बेळगाव शहरासह तालुक्यातील अनेक भागात ढग जमून आले होते. यावेळी विजेचा कडकडाटासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

यावेळी शेतकरी महिला सुशीला या आपल्या शेतामध्ये काम करत होत्या. त्यावेळीच विजेचा कडकडाट होऊन त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये त्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी महिलेच्या अचानक मृत्यूने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.