Friday, November 15, 2024

/

चायनीज मांजामुळे डॉक्टराचे बोट कापले

 belgaum

बेळगाव शहर परिसरात विक्री होत असलेल्या चायनीज मांजाचा अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे गेल्या आठवडाभरात चायनीज मांजामुळे जखमी झालेल्यांची संख्या वाढली असताना एक डॉक्टर देखील जखमी झाला आहे.डॉ प्रशांत सायनेकर हे मच्छे येथे दवाखाना चालवतात काल संध्याकाळी दवाखान्याला गाडीवरून जाताना त्याचे बोट मांज्या लागून कापले आहे गळ्या भोवती अडकलेला मांज्या काढायला गेले गळ्या ला काही झाले नाही पण बोट कापले गेले.

पोलिसांनी चायनीज मांजाची विक्री बंद करावी अशी मागणी वाढू लागली आहे.दिल्ली आणि गुजरात सह अनेक राज्यात चायनीज मांजाच्या विक्रीस बंदी आहे मात्र असा धोकादायक चायनीज मांजाची विक्री बेळगावातील अनेक भागात होत आहे.

Chinise manja

प्लास्टिकच्या सहाय्याने तयार होत असलेला मांज्याला धार असते त्यामुळे अनेक जण जखमी होत आहेत अनेकांचे जीव जात आहेत याची छुप्या पद्धतीने बेळगाव बाजारात होत आहे. मनपाने व पोलीस खात्याने मांजा विकणाऱ्यांचा बंदोबस्त करावा व मांज्या विक्रीवर बेळगावात देखील बंदी घालावी अशी मागणी वाढली आहे.

मागच्या वर्षी काकती येथे एक डॉक्टर या चायनीज मांजामुळे जखमी झाला होता आणि त्याच्यावर बंगलोर येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता.सध्या शाळांना सुट्टी जाहीर होणार आहे त्यातच पतंग उडविण्याचा मोसम सुरू झाला असून तरुणाई मोठ्या प्रमाणावर पतंग उडविण्यात गुंग झालेली असते.आपण पतंग उडविण्यासाठी वापरत असलेल्या चायनीज मांज्यामुळे एखाद्याचा जीव जावू शकतो याचे भानही यांना नसते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.