belgaum

कोर्ट आवारातच रौडीशीटरचा धिंगाणा;

0
1459
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरातील न्यायालयाच्या आवारातच रौडीशीटरकडून पत्रकारांवर हल्ला आणि अवाच्य शिवीगाळ केल्याची गंभीर घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शहबाज पठाण खून प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आलेल्या रौडीशीटरांनी कोर्ट परिसरातच गोंधळ घातला. कर्तव्य बजावत असलेल्या माध्यम प्रतिनिधींवर हल्ला करून त्यांना धमकावण्यात आले. तसेच अवाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली.

या प्रकरणात रौडीशीटर लक्ष्मण दड्डी याच्यासह सवीन दड्डी, बसवराज दड्डी आणि बसवण्णी नाईक यांना न्यायालयात हजर करून पुन्हा हिंडलगा कारागृहात हलविण्यात येत असताना ही घटना घडली. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

 belgaum

मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, न्यायालय परिसरातच रौडीशीटरांचा वाढता धिंगाणा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.