Friday, April 26, 2024

/

मतदान जागृतीसाठी खर्च केली बक्षिसाची रक्कम

 belgaum

बेळगावातील शाळकरी विद्यार्थिनीने स्वतःला मिळालेल्या बक्षिसाच्या रक्कमेचा वापर जनतेत मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी केला आहे.तिला नृत्य आणि अभिनय आदी स्पर्धेत बक्षीस म्हणून रोख रक्कम मिळाली होती.त्या पैशातून तिने व्हिडिओ तयार करून आणि कीर्तन करून 100 टक्के मतदानासाठी जनजागृती केली आहे.

श्रेया विश्वनाथ सव्वाशेरी असे तिचे पूर्ण नाव असून बेळगाव बालिका आदर्श विद्यालयाची दहावीची आदर्श विद्यार्थिनी आहे. ती बाल कीर्तनकार असून तिने वडगाव ज्ञानेश्वर मंदिर, ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांच्या सहकार्यातून “आम्ही सारे मतदान करू इतरांनाही प्रेरित करू शंभर टक्के मतदान करू” हा संकल्प कीर्तनाच्या माध्यमातून मांडला आहे.श्रेयाने स्वतः किर्तन करत या कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला 100% मतदान करण्याचे आव्हान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. बेळगाव वडगांव वझे गल्लीत रहाणाऱ्या या मुलीचे नाव श्रेया सव्वाशेरी असे असून विविध ठिकाणी झालेल्या गायन,पोवाडा आणि वक्तृत्व स्पर्धात पारितोषिके मिळवली आहेत.

बक्षिस म्हणून मिळालेली रक्कम तिने मतदान जागृतीसाठी वापरून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.श्रेया ही बालवक्ता,नृत्यांगना,अभिनय, पोवाडा गायन, गायिका, कीर्तनकार, क्लासिकल नृत्य शिक्षिका, मूवी चाइल्ड कलाकार असून तिने सरकारी व सरकार इतर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये तिने सहभाग दर्शविला आहे.या कामाची सुरुवात वडगांव भागात गॅस सिलेंडर स्फोट मध्ये हात गमावलेल्या रंजिता नावाच्या मूलगीला गायन स्पर्धेत मिळालेली 500 रुपयांची रक्कम मदत करून केली होती. या शिवाय शिवप्रतिष्ठानच्या सुवर्ण सिंहासन मोहिमेला 3000 हजार रुपये,शहापूर येथील तलवार कुटुंबाला 1000 रु.तर मच्छे येथील स्पर्धेत मिळालेलं बक्षीस रक्कम अंबिशन युथ अकडमीला गरीब मुलांना शाळकरी साहित्य देण्यासाठी केली होती.जळीत कुटुंबाला देखील मदत केली होती.

 belgaum

Shreya savvasheri

पुन्हा एकदा देशभक्ती प्रकट करीत शिवराय, संतांची भूमी महाराष्ट्राला स्थिर सरकार व योग्य नेतृत्व मिळावं या उद्देशाने परत एकदा कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीकरिता खर्च केली आहे.स्पर्धा मधील जिंकलेली चार हजारांची रक्कम तिने महाराष्ट्र विधानसभेत लोकशाही बळकटीसाठी 100% मतदान यावर आधारित कीर्तन कारांना घेऊन व्हीडीओ चित्रफीत बनवली आहे .

Shreya savvasheri

ज्ञानेश्वर भजनी मंडळ वडगाव संत मुकुंद पालकर, फकीरा कुंडेकर, श्रीनिवास ताळूकर, रवी पाटील, प्रकाश भंडारे सह संत गणांच्या सहायाने मतदान जागृती कार्यात सहभाग घेतला आहे.सोशल मीडियाचा चांगला उपयोग करून राष्ट्रीय जागृती कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत अनेक व्हिडीओ तिने साकारले आहे. अभिषेक तुनी व कार्तिक के झेड प्रोडक्शन यांनी चित्रित केले असून या कार्यात शाळेचे मुख्याध्यापक एन.ओ. डोणकरी , शिक्षक एकनाथ पाटील, उमेश बेळगुंदकर यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.