Friday, April 19, 2024

/

परिवाहन खात्याने घेतली युवा समितीची दखल

 belgaum

महाराष्ट्र राज्य परिवाहन खात्याने युवा समितीची दखल घेत महाराष्ट्र सरकारच्या सर्व बस वरील फलकांवर बेळगावी ऐवजी बेळगाव असा उल्लेख करू असे लिखित आश्वासन दिले आहे.

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या च्या बसेस वर *बेळगाव* ऐवजी बेळगावी चा वापर होता यासाठी *महाराष्ट्र एकीकरण युवा समिती* च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार कडे याबाबत पत्र लिहून तक्रार दाखल केली होती आणि जर ते बोर्ड बदलले नाहीतर *खळ खट्याक* चा इशारा दिला होता.

16 ऑक्टोबर 2019 रोजी महाराष्ट्र परिवहन मंडळाचे *महाराष्ट्र एकीकरण युवा समिती* ला पत्र आले त्यात न राज्य परिवहन महामंडळाच्या बेळगाव मार्गावर धावणाऱ्या सर्व बसेवर बेळगावी ऐवजी *बेळगाव* च वापर करू असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 belgaum

तक्रारीची दखल घेतल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तर्फे परिवहन मंडळाचे आभार मानण्यात आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.