Thursday, May 2, 2024

/

विमान तळा पासून शहराला बससेवा

 belgaum

सांबरा विमानतळ ते बेळगाव अशा वातानुकुलीत बससेवेचा शुभारंभ दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला.परिवहन मंत्री आणि उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी या नूतन बससेवेचा शुभारंभ ध्वज दाखवून केला.

यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी ,जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त उपस्थित होते.सांबरा विमानतळावरून ही बस राणी चन्नमा चौक तेथून धर्मवीर संभाजी चौक मार्गे उद्यमबाग पर्यंत धावणार आहे.

अनेक दिवसांपासून बेळगाव शहरापासून विमान तळ बससेवा सुरू करा अशी मागणी करण्यात येत होती विमान तळातून शहराकडे टॅक्सी हुन यावे लागत होते आता ही बससेवा सुरू झाल्याने आणखी एक साधन उपलब्ध झाले आहे. सामान्य माणसांना देखील या बसचा फायदा होणार आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.