Tuesday, November 5, 2024

/

‘भ्रष्ट,बेजबाबदार डी डी पी आय पुंडलिकांवर कारवाई करा’-जिल्हा पंचायत

 belgaum

जिल्हा पंचायतीच्या चौसष्ट सदस्यांनी सर्वसाधारण सभेत शिक्षण खात्याचे उप संचालक ए. बी.पुंडलिक यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेऊन जिल्हा पंचायत सी ई ओ नी शिक्षण खात्याच्या अपर आयुक्तांना पत्र लिहिले आहे.ए. बी.पुंडलिक यांच्या कालावधीत झालेल्या गैरव्यवहाराची उच्च अधिकाऱ्याकडून चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे पत्र लिहिले आहे.त्यामुळे पुंडलिक यांच्या आजवरच्या कारभाराची चौकशी करून कारवाई केली जाणार आहे.

पुंडलिक यांनी यापूर्वी बेळगावमध्ये विविध हुद्द्यावर काम केले आहे.कामाच्या बाबतीत त्यांचा बेजबाबदारपणा दिसून आला आहे.कोणतेही काम वेळेत करत नाहीत.त्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे खात्यातील प्रशासन कोलमडले आहे.
नवीन शाळा सुरू करण्यासाठी देखील परवानगी देताना अनेक गैरव्यवहार झाले आहेत.पुंडलिक यांच्यामुळे शिक्षण खात्यातील प्रशासकीय व्यवस्था कोलमडली आहे.अनुदान प्राप्त शाळांच्या पाच वर्षांनी केल्या जाणाऱ्या तपासणीत देखील पैसे दिलेल्यांचे तेव्हढेच पाहणी करून पाच वर्षांची मंजुरी देण्यात आली असून अन्य शाळांना एकच वर्षाची देण्यात आली आहे.

Ab pundlik

शालेय विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या सायकली सदोष असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.याला जबाबदार देखील पुंडलिक असून त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे.नव्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना परवानगी दिली असून त्यामुळे सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.या शाळांना परवानगी देताना देखील मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.कार्यालयासाठी आवश्यक साहित्य खरेदी केल्याचे दाखवून त्याची बिले जोडून पैसे हडप केले आहेत.याचे पुरावेही पत्रासोबत जोडण्यात आले आहेत.

पुंडलिक हे गेली अनेक वर्षे बेळगावात ठाण मांडून बसले आहेत.ते रहिवासी असलेल्या जिल्ह्यात नेमणूक होत नाही पण पुंडलिक शहरातच अनेक ठिकाणी अनेक वर्षांपासून सेवा बजावत आहेत.कारवार मध्ये देखील यापूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते.पुंडलिक यांच्या कारभाराची उच्च अधिकाऱ्याकडून करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी शिफारस पत्राद्वारे करण्यात आली आहे.

डी डी पी आय पुंडलिक यांच्या भ्रष्टाचारा विरोधात जिल्हा पंचायतीचेआरोग्य शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी सभागृहात सातत्याने आवाज उठवला होता त्याची दखल जिल्हा पंचायत ला घ्यावी लागली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.