बेळगाव जिल्ह्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते शंकर गौडा पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचे कार्यदर्शी आर एस शिवकुमार यांनी त्यांची नियुक्तीचा आदेश दिला आहे.
शंकरगौडा पाटील यांनी सुरुवातीपासून बेळगाव जिल्ह्यात भाजपा वाढीसाठी काम केलेले नेते आहेत मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी 2010 मध्ये मुख्यमंत्री कर्नाटक वन विकास औद्योगिक निगम या महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
शंकर गौडा यांनी राष्ट्रीय किसान मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष पद देखील भूषवले होते ते मुख्यमंत्र्यांचे ते निकटवर्ती मानले जातात त्यामुळे यावेळीही त्यांची राजकिय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांना दिलेल्या या पदाचा दर्जा राज्यमंत्र्यांचा असणार आहे आता ते येडीयुरप्पा यांचे राजकीय सचिव म्हणून ते आता काम करणार आहेत. कॅबिनेट मंत्री लक्ष्मण सवदी,शशिकला जोल्ले जगदीश शेट्टर यांच्या नंतर बेळगाव जिल्ह्याला मिळालेलं मोठं पद आहे.