Saturday, April 27, 2024

/

पोलिसावर हल्ला करणा-यांना अटक

 belgaum

कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना सोमवारी अटक केली आहे.आकाश चोपडे आणि महेश चौगुले अशी पोलिसावर हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत. यांना उदमबाग पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी बुधवारी रात्री 1 वाजन्याच्या सुमारास हुल्लडबाजी करण्यावर भर दिला होता. या वेळी दोघा पोलीस आणि गपचूप घरी जावा असे सांगितल्यावर त्यांनाच मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी उद्यांबाग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस गणवेशात पेट्रोलवर होते. तर बीट क्रमांक 1 आणि 2 येथे पोलिस के.के. पाटील आणि राजू हनुमंता अप्परट्टी हे पोलीस सेवा बजावत होते.मध्यरात्रीच्या सुमारास आकाश चोपडे आणि महेश परशुराम चौगुले हे दोघे बेमको येथे हुल्लडबाजी करत होते. या वेळी पोलिसांनी हटकल्याने केल्याने त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला केला.

आरोपींनी पोलिसांचा अवमान केला आहे. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला गेला आणि तपास सुरू करण्यात येत आहे. संबंधित आरोपींची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.