Sunday, September 8, 2024

/

सरस्वती ताईंचे एक पाऊल पुढे……

 belgaum

जे काम मतदारसंघाच्या आमदारांनी करायला पाहिजे ते काम जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील करीत आहेत. आपले कार्यकर्ते आणि समर्थकांची कुमक घेऊन बेळगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागात भेट देण्याबरोबरच तात्काळ मदत मिळवून देण्यात त्या आघाडीवर आहेत. जनतेच्या मदतीसाठी त्यांचे एक पाऊल पुढे आहे.

गोजगे येथे सरकारी शाळा इमारत पडल्याचे समजताच त्यांनी आज भेट देऊन तात्काळ उपाय मिळवण्यावर भर दिला. गट शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांना घेऊन त्यांनी भेट दिली.शाळा एक घरात स्थलांतरित करण्याचा निर्णय तात्काळ घेऊन त्यांनी एक भाड्याची इमारत मिळवून दिली. याकामी गावातील नागरिकांनी त्यांना सहकार्य दिले.याच गावातील 15 घरांचीपडझड झाल्याचे लक्षात येताचतलाठी यांना घेऊन पाहणी केली व ग्रामस्थांना लवकर योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

मन्नुर येथे 18 घरांची पडझड झाली असून तेथेही पाहणी करून ग्रामस्थांना लवकर योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सूचना दिल्या आहेत. याचवेळीजयभारत फौंडेशन तर्फे सरस्वती पाटील यांच्याहस्ते आंबेवाडी येेथे 110 ,90 गोजगा येथे तर 100 मन्नुर येथे याप्रमाणे बेडशीट वाटण्यात आले.

त्यानंतर अलतगा येथील पडझड झालेल्या 10 घरांची पाहणी करून पुढील सूचना करण्यात आल्या आहेत.पीडिओ चेअरमन तलाठी यांना लवकर भरपाई मिळवून देण्याची सूचना त्यांनी केली.त्यांच्यासोबत आर आय पाटील, भाऊ तुडयेकर, शिवाजी राक्षे, विष्णू चौगुले, काटकर व इतर अनेक कार्यकर्ते होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.