Monday, May 6, 2024

/

टिळकवाडीत लाठीमार

 belgaum

टिळकवाडी परिसरात झालेल्या लाठीमार घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. आज रात्री आठ पासून या जखमींवर उपचार करण्यात येत असून पाच जणांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले.

टिळकवाडी पोलीस स्थानक भागातील कृष्णमंदिर येथे बैठक होती. या मंदिराचे काम सुरू आहे. नियोजन सुरू असताना वर्गणी जमा करण्यावरून दोन गटात वादावादी होऊन मारहाण सुरू झाली, पोलिसांनी आवाज थांबवा अशी सूचना केली पण न ऐकल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यात जखमींना उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

ह्रीतिक राजू ढवळे (वय 19), मनोहर जयसिंग भवानी ( वय 60), आदित्य गणेश ढवणे(वय 15), सचिन राणोजी गवळी( वय 32), राजश्री सचिन गवळी(वय 35) मंगळवार पेठ टिळकवाडी अशी जखमींची नावे आहेत.

 belgaum
 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.