कॅम्प सेंट जोसेफ शाळे जवळील अवजड वाहतूक बंद करा व शाळेच्या वेळेत रहदारी पोलीस नियुक्त करा अशी सेंट जोसेफ पालक संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांच्या कडे करण्यात आली आहे..
सकाळीच्या वेळेत कॅम्प भागातून अवजड वाहतूक बंद करा सकाळी 8:30 ते 9 दुपारी 3ते 3:30 तर शनिवारी दुपारी दुपारी 12 रहदारी पोलीस नियुक्त करा असे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे.बेळगावचा कॅन्टोन्मेंट विभागात येणारा कॅम्प परिसर हा पूर्वीपासूनच अतिशय शांत आणि रहदारीने मुक्त भाग म्हणून ओळखला जात होता. पण सध्या ही ओळख पुसली जात आहे. मोटारसायकल आणि कार बरोबरच या भागातून धोकादायक अवघड वाहतूक वाढली आहे.
कॅम्प परिसरात लहान वाहनांची वर्दळ तुरळक असते, या भागात राहणारे नागरिक आणि शहरातून पुढे टिळकवाडी कडे जाणारे व येणारे वाहन चालक वगळता इतर वाहने कमी प्रमाणात या मार्गे जात होती. या भागात अनेक शाळा आहेत. सामान्य नागरिक चालत प्रवास करतात. अवजड वाहतूक वाढल्याने या लोकांनाच रस्ता ओलांडणे अवघड जात आहे. अवजड वाहनांच्या वेगावर निर्बंध सुद्धा घालण्यात आलेले नाहीत याचा कॅन्टोन्मेंट बोर्ड व रहदारी पोलीस जरूर विचार करतील अशी अपेक्षा आहे.