Saturday, April 20, 2024

/

श्रीरामसेनेच्या युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

 belgaum

शिवू उप्पार मृत्यू प्रकरणी योग्य तपास करून त्याला न्याय मिळावा या मागणीसाठी श्रीराम सेनेच्या एका युवक कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी 8 जुलै रोजी बेळगावातील सी पी एड मैदानावर ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसप्पा ए गौडर वय 18 रा. रायचूर असे विष प्राशन केलेल्या युवकाचे नाव आहे.लागलीच त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्या प्रकृती धोक्या बाहेर असून सुधारणा होत आहे.

श्री राम सेनेच्या वतीने सी पी एड मैदानावरून शिवू उप्पार याच्या मृत्युच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात सहभागी होण्यासाठी हा युवक कार्यकर्ता बेळगावला आला होता राज्यातील अनेक जिल्ह्यातून रामसेनेचे कार्यकर्ते बेळगावातील सी पी एड मैदानावर जमले होते अचानक बसप्पा याने विष प्राशन केल्याने मैदानात गोंधळ उडाला होता.ए पी एम सी पोलीस निरीक्षक जे एम काळीमिरची यांनी विष प्राशन केलेल्या युवकाच्या तब्येतीची विचारपूस केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.