Saturday, April 20, 2024

/

खानापुरात ऑपरेशन कमळ करण्यास भाजपचा विरोध

 belgaum

राज्यातील सरकार स्थापनेच्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर या काँग्रेस पक्षाला राजीनामा देऊन भाजप प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या बेंगलोरहून येत आहेत. याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींनी तालुका पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेतल्यास त्याचा तीव्र विरोध करण्यात येईल. तसेच पक्षश्रेष्ठी याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत सदस्य नोंदणी अभियानही स्थगित ठेवण्याचा निर्णय सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला.

निजद काँग्रेसमधील आमदारांनी राजीनाम्याचे सत्र सुरू केल्याने राज्यातील मैत्री सरकार अल्पमतात आले आहे. सध्या विधानसभेत 210 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामध्ये भाजपकडे 106 आमदार असल्याने नाराज आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकामी काँग्रेस निजदमधील नाराज आमदारांचा पाठिंबा घेऊन भाजपचा सरकार स्थापनेसाठी आटापिटा सुरू आहे. त्यासाठी काँग्रेसमधून नाराज आमदारांना गळ घातली जात आहे.

राज्यामध्ये चाललेल्या राजकिय घडामोडीमध्ये अन्य पक्षांमधून आमदारांना भारतीय जनता पार्टीमध्ये आयात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खानापूरच्या काँग्रेसच्या आमदार अंजली निंबाळकर यांनाही भाजपमध्ये प्रवेश देऊन ऑपरेशन कमळ राबविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बेंगलोरमधील दोन दिवसाच्या घडामोडींवरून दिसून येत आहे. असे झाले तर खानापुर तालुक्यामध्ये कोणतीही सभा कींवा सदस्य अभियान व पक्षाचे कोणतेही कामकाज करण्यात येणार नाही. असा निर्णय भाजपच्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील, मारुती पाटील (जन.सेक्रेटरी), संजय कंची (जन.सेक्रेटरी),
प्रमोद कोचेरी(जिल्हा उपाध्यक्ष),
संजय कुबल (जिल्हा उपाध्यक्ष), धनश्री सरदेसाई, बाबूराव देसाई,जोतिबा रेमानी , सुभाष गुळशेट्टी, शरद केशकामत, बसवराज सनिकोप, गुंडू तोपिनकटटी, सुरेश देसाई, राजेन्द्र रायका, जितेंद्र मादार, सुरेश म्यगेरी, मल्लाप्पा मरिहाळ, हणमंत पाटील, यशवंत कोडोळी ,सुभाष कुरेन्नवर, प्रकाश तिरविर, रवी बनोशी, महादेव गावकर, राजू डांगे, विजय कामत, महरुद्र्या हिरेमठ, बाबासाहेब देसाई, श्रीकांत इटगी, मारुती कमतगी, मारुती टक्केकर, राजश्री देसाई, वासन्ती बडीगेर, विठ्ठल निडगलकर, सुनिल नायक यांच्यासह पदाधिकारी, पक्षाचे राज्य, जिल्हा व तालुका प्रमूख सभेला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.