belgaum

Mangai templeवडगांवची ग्रामदेवता आणि नवसाला पावणारी देवी म्हणून बेळगाव परिसरात प्रसिद्ध असलेली वडगांवच्या मंगाईदेवीची यात्रा मंगळवार पासून सुरू होणार आहे. त्या निमित्ताने मंगाई मंदिर परिसराची साफ सफाई करण्यात आली असून दुकाने घालण्यात आली आहेत.

मंदिरा समोर चिपिंग टाकण्यात आली आहे महिलांना आणि पुरुषांसाठी दर्शन लाईन करण्यात आली आहे. वडगांव भागात यात्रेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मंदिर परिसरात विविध साहित्य विक्रीसाठी स्टॉल मांडण्यात आले आहेत बालचमुसाठी खेळणी,विविध प्रकारचे पाळणे लक्ष वेधून घेत आहेत.

bg

आज रविवार असल्याने आठवडा बाजारात कोंबडे व बकरी खरेदीसाठी मोठी गर्दी होती मंगळवार हा यात्रेचा मुख्य दिवस असेल मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गाऱ्हाणे उतरविण्यात येतील व यात्रेला सुरुवात होईल श्री मंगाई देवी कमिटी, प्रशासन व पोलीस दलाने यात्रा शांततेत पार पडावी यासाठी कंबर कसली आहे.

मंगळवारी सुरू असलेली यात्रा आगामी रविवार पर्यंत असते दर्शनासाठी केवळ बेळगावच्या जवळपास लोक गर्दी करत असतात.मंगळवारी वडगांवला जाणाऱ्यांची गर्दी ओळखून पोलीस प्रशासनाने देखील बंदोबस्त ठेवण्याची तयारी केली आहे.दरवर्षी या यात्रेत पाऊस पडतोच यावर्षी देखील पावसाची अपेक्षा आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.