Sunday, May 26, 2024

/

आम्हाला तोच पी डी ओ हवा…

 belgaum

आमच्या ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात अनेक विकास कामे राबवण्यात सक्रिय असलेले जुने पी डी ओ द्या या मागणीसाठी शेकडो उद्योग खात्री योजनेत काम करणाऱ्या महिलांनी केली आहे.

कलखांब ग्राम पंचायतीचे पी डी ओ गोपाळ बुडशी  यांची बदली रद्द करावी या मागणीचे निवेदन कलखांब ग्राम पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्यांनी जिल्हा पंचायत सी ई ओ राजेंद्रन  यांना दिले आहे.

Pdo
मंगळवारी दुपारी कलखांब येथील उद्योग खात्री योजनेत काम करणाऱ्या महिलांनी पी डी ओ ची बदली रद्द करा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. गुडशी या पी डी ओ नी कलखांब गावांत पाणी गटार रस्ते पथदीप अश्या अनेक समस्या सोडवण्यात चांगले काम केले आहे त्यामुळे त्यांची बदली रद्द करा अशी मागणी केली आहे.

 belgaum

जिल्हा पंचायत समोर आंदोलन करत त्यांनी निवेदन सादर केले . कलखांब ग्राम पंचायत पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मतदार संघात येते अनेकदा ग्रामस्थांनी तो पी डी ओ द्या अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.