Sunday, September 8, 2024

/

अशोक दुडगुंटी नवीन महापालिकेचे आयुक्त

 belgaum

बेळगावचे अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त अशोक दुडगुंटी यांची बेळगाव महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे . राज्य सरकारने शनिवारी सायंकाळी दुडगुंटी यांच्या नियुक्तीचे आदश जारी केले आहेत.
बेळगाव महा पालिका आयुक्त पदी कार्यरत असणारे शशिधर कुरेर यांची बदली करण्यात आली आहे . दुडगुंटी हे लवकरच आपल्या पदभार स्वीकार करणार आहेत.

३७ वय आलेले अशोक दुडगुंटी हे तरुण के ए एस अधिकारी बेळगाव पालिकेला लाभले आहेत ते बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील मूळचे अंकलगी रहिवाशी आहेत. २००५ मध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे त्या नंतर के पी एस सी परीक्षेत राज्यात दहावा रँक घेऊन पास झाले शासकीय सेवेत दाखल झाले. या अगोदर त्यांनी जमखंडी उपविभागीय अधिकारी,विधान सौध सचिवालयात वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये सहाय्यक आयुक्त बागलकोट आणि गुलबर्गा मध्ये अप्पर जिल्हाधिकारी तसेच अतिरिक्त बेळगाव प्रादेशिक आयुक्त म्हणून सेवा बजावली आहे.

ASHOK CCB

स्मार्ट सिटी अंमलबजावणी आगामी महा पालिका निवडणूक आणि इतर मोठ्या घाडामोडी साठी दुडगुंटी सारख्या अनुभवी अधिकाऱ्यांची गरज होती त्या नुसार पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या शिफारशी नुसार त्यांची नियुक्ती झाली आहे.

लोकसभा निवडणुकी नंतर पालक मंत्री सतीश जारकीहोळी हे कुरेर यांच्या साठी इच्छुक नव्हते तश्या बातम्या आल्या होत्या गेल्या आठवडा भर पूर्वीच कुरेर यांनी घेतला होता आता त्यांची बदली करण्यात आली आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.