Saturday, April 20, 2024

/

‘मुचंडीच्या या युवकाने केलं एअरफोर्स परेडचे नेतृत्व’

 belgaum

बेळगावातील युवक केवळ आर्मी नव्हे तर नेव्ही एअर फोर्स मध्ये देखील भर्ती होत बेळगाव शहराचं नाव मोठं करताना दिसत आहेत.मुचंडी गावच्या आशुतोष पाखरे या युवकाने केवळ भारतीय वायू सेनेत प्रवेश मिळवला नाही तर पासिंग आऊट परेडचे नेतृत्व करत बेळगाचे नाव देखील उज्वल केले आहे.

बारावी सायन्स झाल्यावर इंजिनियरिंग करत असताना आसूतोष याने एअर फोर्स नॉन टेकनिकल ट्रेड स्पर्धा परीक्षा दिली त्यात उत्तीर्ण होत वायू सेनेत प्रवेश मिळवला.त्याचे वडील परशुराम पाखरे हे एक्स सर्व्हीस मन आहेत.

Air force pared leader

शनिवारी सांबरा येथील एअर फोर्स ट्रेनिंग सेंटर मध्ये पासिंग आऊट परेड झाला.यावेळी प्रशिक्षणार्थी एअरमननी शानदार पथ संचलन केलं. या पथसंचलन करणाऱ्या एअर वारीयर ड्रिल टीमचे नेतृत्व करणारा युवक बेळगावचा होता.सांबरा वायुदल ट्रेंनिग सेंटरच्या इतिहासात प्रथमच बेळगावच्या युवकांने परेडचे नेतृत्व केले होते.

देशातील विविध भागातून विविध पदावर भर्ती झालेल्या 3400 प्रशिक्षणार्थीनी शपथ घेतली या सर्व प्रशिक्षणार्थी मधून आशुतोष याची निवड एअर वारीयर ड्रिल टीम मधून ‘परेड कमांडर’ म्हणून झाली होती शनिवारी झालेल्या परेडचे नेतृत्व त्यानें केले होते.

Aasutosh pakhare airforce

सांबरा येथील एअर मन ट्रेनिंग सेंटर मध्ये भारतीय वायू दलात भर्ती झालेल्या बेसिक ट्रेनिंग घ्यावेच लागेल अश्या वेगवेगळ्या पदाच्या 3400 जणांचे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे त्या सर्वांचा शपथविधी झाला.या ट्रेनिंग सेंटर परेडचे नेतृत्व करणारा आसूतोष हा पहिला बेळगावचा युवक ठरला आहे.एअर वारीयर ड्रिल टीमचे नेतृत्व करणाऱ्या आशुतोष ची कामगिरी ही मुचंडी गावासाठी अभिमानाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.