बेळगाव मुंबई विमान सेवा सुरूअनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या मुंबई विमानसेवेला स्पाईस जेटने आजपासुन प्रारंभ केला. पहिल्याच फेरीला प्रवाश्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. 50 प्रवाश्यांनी मुंबईकडे उड्डाण केले तर मुंबईहून 62 प्रवाशांचे आगमन झाले. हैदराबाद, पुणे, अहमदाबाद नंतर उडानमुळे मुंबई हे विमानसेवेशी जोडणारे चौथे शहर ठरले.
पहिल्याच विमानातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाश्यांना बोर्डिंग पास आणि पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या.
सेवेचे उदघाटन आम.अभय पाटील आणि विमानतळ संचालक राजकुमार मौर्य यांच्या हस्ते दीप दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी केक कापून मिठाईचे वाटप करण्यात आले.
रोज बंगळूर-बेळगाव ते मुंबई आणि परतीचा मुंबई- बेळगाव- बंगळूर असा प्रवास करणार हे विमान करणार असून यात 90 आसनांची सोय आहे.
बेळगावहून रोज दु 12.25 वा उड्डाण करणारे विमान दु 1.45 वा मुंबईला पोचणार आहे. तर मुंबईहून परतीचे विमान दु. 2.50 ला उड्डाण करणार असून 4 .05 वाजता बेळगावला पोचणार आहे. मुंबई बरोबरच स्पाईस जेटने आजपासून बंगळूर- बेळगाव फेरीचा शुभारंभ केला. बंगळूरहुन सायं 4.45 ला सुटणारे विमान 6.05 बेळगावला पोचणार आहे. बेळगावहून 6.25 ला उड्डाण करणारे विमान 7.25 ला बंगळूरला पोचणार आहे.
सध्याची बेळगाव मुंबई विमनसेवेसाठी 90 सीटर क्षमतेचे विमान सुरू केले असून या बंगळुरू बेळगाव मुंबईसाठी एअर बस सुरू करू अशी माहिती स्पाईस जेटच्या सूत्रांनी दिली आहे.