Friday, March 29, 2024

/

विजय मोरे व अमर येळ्ळूरकर देणार दर महिन्याला 4000- समाजाकडेही मदतीचे आवाहन

 belgaum

बेळगाव शहरातील छायाचित्रकार प्रताप आढाव यांचे गुरुवारी अचानक निधन झाले. हृदयविकाराने निधन झाल्यानंतर आढाव कुटुंबाचा एक मोठा आधार हरपला आहे.

प्रताप एकमेव कमावते होते, त्यांचा 19 वर्षाचा मुलगा पियुष अपघाताने अधू झाला आहे, अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाची गुजराण होणे कठीण बनले आहे. त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित माजी महापौर विजय मोरे यांनी ही परिस्थिती उपस्थित समाजासमोर मांडली.

पायोनियर अर्बन बँकेचे संचालक या नात्याने बैठकांना मिळणारे मानधन एकत्रित करून माजी महापौर विजय मोरे आणि ऍडव्होकेट येळ्ळूरकर यांनी या कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी दरमहा एकत्रित चार हजार रुपये देण्याचा निर्णय यावेळी सांगितला. आणि समाजानेही मदत करण्याचे आवाहन केले.

 belgaum

Pratap aadav
या आवाहनाला प्रतिसाद देऊन सचिन कलवार यांनी पियुष आढाव याच्या उपचारांसाठी 25000 , विल्सन कार्व्हालो यानी 5000, अनिल पावसे यांनी 5000, उदय पंडित, सुभाष कुडचकर, प्रकाश बाळेकुंद्री चंद्रकांत सावंत यांनी प्रत्येकी दोन हजार, शिवजयंती उत्सव मंडळातर्फे 5000, डॉ राजेश उदगडगे यांनी 5000, भावकांना चौगुले संदीप देसुरकर आणि भावकू दुर्गे यांनी भरीव मदत केली आहे.

यापुढील काळात ही मदत करण्याची मागणी करून विल्सन कार्व्हालो 9341121020 व सचिन कलवार 9886011962 यांच्याकडे मदत जमा करण्याचे ठरवण्यात आलेले आहे. बेळगाव जिल्हा फोटोग्राफर संघटना, सार्थक मल्टीपर्पज सोसायटी, धनसंपदा चिट फ़ंड, केतन पवार आणि इतर अनेक नागरिकांनी यावेळी निधी जमवून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे छायाचित्रकार प्रताप आढाव यांच्या कुटुंबाला आधार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.