Thursday, April 25, 2024

/

बेळगावात शिवजयंतीची जल्लोष सुरू

 belgaum

बेळगावात दरवर्षी परंपरे प्रमाणे शिव जयंती साजरी केली जाते दरवर्षी वैशाख शुद्ध द्वितीयेला पूजन होते दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढली जाते.सोमवारी सकाळी महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यावरून युवकांनी आणलेल्या  शिव ज्योतीचे स्वागत करण्यात आले.

गेल्या दोन दिवसापूर्वी युवक मंडळे महाराष्ट्रातील रायगड राजगड सिंधुदुर्ग विजयदुर्ग ज्योत आणण्यासाठी रवाना झाले होते सगळे युवक सकाळी गटां गटाने दाखल होत होते.मध्यवर्ती शिव जयंती उत्सव महा मंडळाच्या वतीने संभाजी चौकात विविध गटातील युवकांचे स्वागत करण्यात आले.ज्योती आणणाऱ्या युवकात बाल चमुंचा सहभाग लक्षणीय होता.

बेळगावच्या शिव जयंती उत्सवाला 100 वर्षें पूर्ण झाल्याने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी रात्री वडगांव येथील तर बुधवारी रात्री बेळगाव शहरात चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे.शहरात अनेक मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

 belgaum

Shiv jayanti

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवरायांचे विधिवत पूजन

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने १९१९ पासून सुरू असलेल्या पारंपरिक शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांचे विधिवत पूजन नरगुंदकर भावे चौकातील मंडपामध्ये अध्यक्ष दिपक दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम शिवरायांच्या पुतळ्यास हार अर्पण करून शिवरायांची आरती म्हणण्यात आली. यावेळी खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी उपमहापौर रेणु किल्लेकर,रणजित चव्हाण, रमेश पावले, बाबूलाल राजपुरोहित, गणेश दड्डीकर, मदन बामणे व इतर असंख्य शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते

मध्यवर्तीच्या वतीने शिवाजी उद्यानात शिवपुतळ्यास हार अर्पण

अध्यक्ष दिपक दळवी यांच्या हस्ते हार अर्पण करून शिववरायांना अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी आमदार संभाजी पाटील, प्रकाश मरगाळे,नगरसेविका सुधा भातकांडे, राजू मोरे, विश्वनाथ सूर्यवंशी, विकास कलघटगी,शिवराज पाटील,शुभम शेळके, श्रीकांत कदम व इतर नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.