बैलहोंगल तालुक्यातील बैलवाड या गावात 60 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर प्यास फाउंडेशनने तलाव खणून तयार केला आहे . या तलावात भरपूर कठीण असे दगड होते पूर्वी या ठिकाणी सिद्ध बसवेश्वरांच्या मंदिराची ख्याती होती.
काम सुरू करण्यात आल्यानंतर अतिशय कठीण प्रकारचे दगड फोडावा लागत होता, या ठिकाणी अनेक प्रकारचे प्रयत्न केले दगड फोडण्यात आला. बदल घडवून आणायचा या विचारातून तरुणांनी प्रचंड काम केले. गावातील लोक दररोज अपेक्षांनी येऊन पाहून जात होते.
कारागृहात कैद्यांना जी सक्तमजुरीची शिक्षा दिली जाते त्या पद्धतीने दगड फोडण्याचे काम झाल्यानंतर उत्कृष्ट असा तलाव तयार झाला आहे .या तलावातून पाणी झिरपू नये म्हणून काळी माती घालण्यात आली आहे. यापुढील काळात पावसाळ्यात येथे पाणी साचेल आणि उन्हाळ्यात ते झिरपून जाणार नाही याची व्यवस्था करण्यात आली आहे.