belgaum

भाग्यनगरचा साईश मेंडके जिल्ह्यात बारावीत प्रथम

0
2062
Satish mendake
 belgaum

पी यु सी द्वितीय  परीक्षेचा निकाल लागला असून एकूण 32 जिल्ह्यापैकी बेळगाव जिल्ह्याचा 28 वा क्रमांक लागला आहे.जिल्ह्याचा निकाल 56.18%  लागला आहे.

टिळकवाडी येथील जी एस एस कॉलेजचा बारावीचा विद्यार्थी साईश श्रीकांत मेंडके रा. सहावा क्रॉस भाग्यनगर याने बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.सोमवारी बारावीचे निकाल जाहीर झाले त्यात सतीश याने एकूण 600 पैकी 591 गुण मिळवत  राज्यात चौथा वा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

Satish mendake

 belgaum

साईशचे वडील श्रीकांत मेंडके हे इन्शुरन्स कंपनीत काम करतात तर आई गृहिणी आहेत .निकाल लागताच जी एस एस कॉलेज आणि सतिशच्या घरी जल्लोष व्यक्त करण्यात आला.सतिशच्या आईने मिठाई भरवत आनंद व्यक्त केला.सतीश हा नंबर मिळवत कॉलेजचे आणि आपल्या आई वडिलांचे नाव उज्वल केल्याने जी एस एस कॉलेजच्या प्राध्यापकांनी देखील हर्ष व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.