Sunday, April 28, 2024

/

15 मे पासून बेळगावहुन थेट अहमदाबाद विमानसेवा 

 belgaum

संजय घोडावत यांच्या मालकीच्या स्टार एअर कम्पनीने अखेर बेळगाव अहमदाबाद विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून आता 15 मे पासून बेळगाव अहमदाबाद ही विमान सेवा दररोज सुरू होणार आहे.

केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात स्टार एअरला बेळगाव अहमदाबाद हा रूट मिळाला होता मात्र ही विमान सेवा कधी सुरू होणार हे जाहीर झाले नव्हते शेवटी आज तारीख जाहीर झाली असून आजपासून महिन्यांनी ही विमान सेवा सुरू होईल.

Star air

 belgaum

स्टार एअरने बेळगाव अहमदाबाद  2999 रुपयांत प्रवास सुरुवात केली आहे

बेळगाव ते अहमदाबाद असे असेेेल वेळापत्रक

बेळगाव( IXG) Deprt अहमदाबाद (AMD) Arrival
OG-107 09:20 11:05 रविवार सोडून दररोज
OG-107 16:40 18:15 फक्त रविवारी
 अहमदाबाद( AMD) Deprt  बेळगाव (IXG) Arrival
OG-108 11:25 13:00 रविवार सोडून दररोज
OG-108 18:45 20:20 फक्त रविवारी

 

बेळगाव हुन गुजरात राजस्थान ला जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे रेल्वे गाड्या नेहमी फुल्ल असतात त्यात ही विमानसेवा गुजराती राजस्थानी आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून फायदेशीत ठरणार आहे .या शिवाय अहमदाबाद थेट बेळगाव विमान तळाशी जोडल्याने उत्तर भारतातील महत्वाच्या शहरांशी बेळगावची कनेक्टिव्हिटी वाढायला मदत होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.