Monday, April 29, 2024

/

अपघातात जाफरवाडीचा युवक ठार

 belgaum

मंगळवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात जाफरवाडी येथील एक युवक ठार झाला आहे. ही घटना कंग्राळी पुलाजवळ घडली होती. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बाबू यल्लाप्पा पाटील (वय 35) रा. जाफरवाडी, ता बेळगाव असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. तो रात्री कंग्राळीहुन जाफरवाडीकडे येत होता. मात्र वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Youth death in accident

 belgaum

मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. त्याला तातडीने खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले होते. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला आहे.

अपघात कसा झाला याबाबत अजूनही योग्य माहिती मिळाली नाही. याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. बाबूच्या अपघाती निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.