Friday, April 26, 2024

/

‘गवीरेड्याच्या उपचारासाठी सरसावले वन खाते’

 belgaum

जंगलातील गवीरेडा हंगरगे गावाच्या शेतवाडीत आल्यामुळे जनतेत घबराट पसरली असून शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला जखमी केल्याची घटना घडली आहे.

गवीरेडा आल्याची घटना कळल्यावर पोलीस आणि वन खात्याला कळविण्यात आले.वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी गवी रेड्याला जंगलात पिटाळण्याचे प्रयत्न केले यावेळी या गवी रेड्याच्या पायाला जखम झाल्याचे  वन कर्मचाऱ्यांना ध्यानात आले.नंतर बरेच प्रयत्न करून गवी रेड्याला पकडण्यात यश मिळाले.गेल्या दोन दिवसा पासून हा गवा हंगरगे शेतवडीत ठाण मांडून होता.

Forest kon

 belgaum

आता गवीरेड्याच्या पायावर उपचार करून त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे.सध्या गवी रेड्याला पाणी देण्यात आले त्या नंतर त्याच्या वर उपचार सुरू आहेत.डी सी एफ एम व्ही अमरनाथ डेप्युटी आर एफ ओ विनय गौडर यांच्या नेतृत्वाखाली गव्या वर उपचार सुरू आहेत माजी तालुका पंचायत सदस्य कृष्णा हुंदरे देखील यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.