Friday, March 29, 2024

/

बस चालकास साडे चार लाखास लुटले

 belgaum

बँकेतून रोख रक्कम काढून रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका बस चालकाची बॅग हिसकावून त्यातील साडे चार लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.शहरातही हंस टाकीज रोड वर भर दुपारी ही घटना घडल्याने बराच गोंधळ झाला होता.

चन्नबसप्पा कोळीवाड रा. बेळगाव असे चोरी झालेल्या या बस चालकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चन्नबसप्पा यानी कॅनरा बँकेतुन साडे चार लाख रक्कम काढली आणि ते बॅंकेतून बाहेर पडले बापट गल्ली कॉर्नर जवळ असताना चालत जाणाऱ्या दोन युवकांनी त्यांच्या हातातील बॅग घेऊन पलायन केले.

घटना समजताच खडे बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला आज मंगळवार असल्याने या भागातील सर्व दुकाने बंद होती त्यामुळे सी सी टी व्ही फुटेज मध्ये चोरटे सापडणे मुश्किल आहे इतकेच काय तर इतर ठिकाणी चोरट्यांचे चेहरे सी सी टी व्ही कैद झालेत का याचा तपास पोलीस करताहेत.या प्रकरणी खडे बाजार पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.