Saturday, April 20, 2024

/

काय…. खासदारांची तिकिटे नाकारणार?

 belgaum

लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे आणि तिकीटे मिळवण्याची धडपड सुरू असतानाच भाजप पक्षाच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सध्या खासदार पदावर असलेल्या व्यक्तींचे तिकीट यावेळी नाकारले जाणार व भाजप नव्या चेहर्‍यांना स्थान देणार अशी माहिती आहे. टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राने या गोष्टीला प्रकाशझोतात आणले आहे.

बेळगाव सह म्हैसूर बेंगलोर उत्तर धारवाड बिदर आणि विजापूर येथील खासदार पदावर असलेल्या उमेदवारांना बदलून नवीन चेहऱ्यांना वाव दिला जाणार आहे. यासंदर्भात भाजप नेतृत्वाने विचार सुरू केला आहे. पक्षातूनच होत असलेला विरोध लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे असे वृत्त या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. यामुळे खळबळ माजली आहे.

बेळगाव तीन वेळा भाजपला गड जिंकून देणारा मतदारसंघ असला तरी सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले सुरेश अंगडी पार्टीसाठी काळजीचे ठरले आहेत. यामुळे पक्षाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये पंचमसाली लिंगायत उमेदवार म्हणून निश्चित केला तरच पक्षाला विजय मिळवता येईल असे स्पष्ट झाले असून, म्हणूनच त्यांना बाजूला सारण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती उघड होत आहे.

Suresh angdi mp
बेळगाव येथील ऑल अबाऊट बेळगाव या इंग्रजी वेब पोर्टलने सर्वे केला होता या सर्वेमध्ये मतदारांनी आम्हाला भाजपला मतदान करायचे आहे मात्र भाजपच्या विद्यमान खासदारांना जर परत उमेदवारी दिली तर भाजपला मतदान करणार नाही असा ओपिनियन पोल दिल्यामुळे गोंधळ माजला होता. पक्षाने उमेदवार बदला बद्दल काही बोललेलं नसतानाही नागरिकांनी असा कौल दिला होता या सगळ्या सर्वेक्षणाचा उपयोग करून भाजप उमेदवार बदलासाठी प्रयत्न करत आहे.

काँग्रेसकडे भाजपला तोंड देण्यासारखा प्रबळ उमेदवार नसल्यामुळे भाजप ही जागा घालू देणार नाही तर उमेदवार बदलल्यास ही जागा हातात येत असल्यास त्याचा नक्किच विचार करेल अशी चर्चा आहे.
काँग्रेसचे खासदार प्रकाश हुक्केरी बेळगाव मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे .त्यामुळेच उमेदवार बदलीचा विचार भाजप करत असल्याचे जाणवत असून असे असले तरी अंतर्गत राजकारणात अंगडी यांना तिकीट मिळणारच असे बोलणारे लोकही आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.