Saturday, April 20, 2024

/

सर्व्हे अधिकारी पुन्हा धारेवर

 belgaum

रिंग रोड भु संपदानाचा सर्व्हे करायला आलेल्या खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कडून धारेवर धरण्यात आले. काल त्यांची उपकरणे आणि चार चाकी वाहने शेतकऱ्यांनी जप्त करून पंचायतीत ठेवली होती त्या नंतर पोलिसांच्या हस्तक्षेपा नंतर सदर प्रकरणा बाबत आज बैठक होणार होती.

सोमवारी प्रांताधिकारी यांच्याशी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर दिले नाही.तहशीलदारांशी संपर्क साधल्यावर आपली बदली झाली आहे असे सांगण्यात आले. तुम्ही नवीन तहसीलदार यांच्याशी संपर्क साधा असे सांगण्यात आले.नवीन तहसीलदारांनी आपल्याला काहीच माहीत नाही अशी भूमिका घेतली.

शिरस्तेदार आणि मुतगा सर्कल यांना पाठविण्यात आले. त्यांना सर्व परिस्थिती सांगितल्यावर पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व इतर अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आल्यानंतर सर्व्हे करण्यासाठी कुणीच ऑर्डर देण्यात आलेली नव्हती अशी माहिती उघड झाली आहे. आदेश नसताना हे कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर शेतकऱ्यांनी मारिहाळ पोलिसात तक्रार नोंदवली आहे असून अजून गुन्हा नोंदवला गेला नाही.

Serve ring road

कोणतीही परवानगी नसताना सर्व्हे करायला सदर लोक कसे येऊ शकतात याला अधिकाऱ्यांची फूस आहे का?असा सवाल करत शेतकऱ्यांनी सदर सर्व्हे साठी कुणी परवानगी दिली याची कागदपत्रे दाखवा आणि सर्व्हे उपकरणे वाहने घेऊन जा अशी भूमिका घेतली आहे.याबाबत मारिहाळ पोलीस काय करणार हे पहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.