Friday, April 19, 2024

/

मोटारसायकल कार अपघात एक ठार दोन जखमी

 belgaum

के एल ई आयुर्वेदिक कॉलेज जवळ बुधवारी रात्री झालेल्या मोटारसायकल व कार धडकेत एक ठार तर दोघे जखमी झाले आहेत.
शिवानी सुभाष सडेकर (वय 19) रा. भारतनगर वडगांव ही ठार झाली तर अभिषेक शट्टूप्पा माडूळकर (वय 18) रा. पवार गल्ली शहापूर व गजानन धाकलु कागले ( वय 23) रा. गणेबैल ता. खानापूर हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

मयत सुहानी ही कॉलेज विध्यार्थीनी होती तिच्या वडिलांचे देखील सव्वा वर्षा पूर्वी निधन झाले होते.जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते इस्पितळात तिचे निधन झाले.

मोटारसायकलवरून ट्रिपल सीट वेगाने जात होते. तेंव्हा कारला धडक बसून ही घटना घडली. रहदारी दक्षिण विभाग पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.