Friday, March 29, 2024

/

बेळगावात निवडणूक प्रक्रिया मराठीतूनही करा

 belgaum

बेळगावसह सीमा भागात होणाऱ्या आगामी निवडणूक प्रक्रिया कन्नड आणि इंग्रजीबरोबर मराठी भाषेतूनही करा असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

गेल्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देत आगामी निवडणुकात निवडणूक अर्ज भरणे,शासकीय जाहिराती,निवडणुकीची सर्व परिपत्रक कन्नड इंग्लिश सोबत मराठीतून द्या अशी मागणी केली होती.

सदर निवेदना बद्दल कोणतेच उत्तर न आल्याने वकील महेश बिरजे यांनी माहिती हक्क द्वारे मध्यवर्ती समितीच्या निवेदनावर कोणती कारवाई केला याची माहिती मागितली होती.त्याला राज्य निवडणूक आयोगाने उत्तर दिले असून समितीच्या मागणीच्या अर्जावर कारवाई करा असा आदेश दिला असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील बिरजे यांना पाठवलेल्या उत्तराची प्रत पाठवण्यात आली आहे. सहाययक निवडणूक अधिकारी बी व्ही लक्ष्मीश्वर यांनी सही करून हे पत्र पाठवलं आहे.

 belgaum

Election commission

बेळगाव सह सीमा भागात भाषिक अल्पसंख्याक कायद्या नुसार मराठीत इतर शासकीय परी पत्रके देण्यास दिरंगाई करणारे अधिकारी निवडणूक आयोगाचा आदेश मानून आगामी लोकसभा आणि महा पालिका निवडणुकीतील शासकीय प्रक्रिया कन्नड इंग्लिश बरोबर मराठीत राबवण्यास पुढाकार घेतील का हाच मुख्य प्रश्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.