शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित चित्रपट ‘ठाकरे’ उद्या शुक्रवार 25 रोजी देश भरासह बेळगावात रिलीज होत आहे.बेळगावातील प्रकाश ,ग्लोब आणि आयनॉक्स, बिग सिनेमा मध्ये देखील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.प्रकाश ग्लोब मध्ये मराठी तर आयनॉक्स आणि बिग सिनेमामध्ये हिंदी मराठी रिलीज होणार आहे.
बाळासाहेब आणि बेळगाव सीमा प्रश्नाचे नाते एकदम अतूट आहे या चित्रपटात देखील बाळासाहेबांना बेळगाव विषयी किती तळमळ होती हे दाखवण्यात आले आहे भाषावार प्रांत रचनेत मोरारजी देसाई यांची भूमिका असलेल्या ट्रेलर मध्येच बेळगावचा उल्लेख आहे त्यामुळे या चित्रपटा विषयी बेळगावातील मराठी भाषकात कमालीचे आकर्षण आहे.शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हा चित्रपट निर्माण केला असून बाळासाहेब त्यात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची ठिणगी दाखवली आहे त्यामुळं या चित्रपटाची उत्सुकता बेळगावकरा मध्ये अधिक आहे.
बेळगाव शिवसेनेच्या वतीनं या चित्रपटाचे जोरदार आणि जल्लोषी स्वागत करण्यात येणार असून ग्लोब थिएटर च्या पहिल्या शो ची सर्व तिकीटे शिवसैनिकांनी बुक केली आहेत.ग्लोब समोर स्वर्गीय शिवसेना प्रमुखांचे बॅनर लावत या सिनेमा घराला सजवण्यात आले आहे.बेळगाव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून पहिल्या शो ची तिकीट घेतली आहेत.ग्लोब प्रमाणे प्रकाश सिनेमा घरात देखील मराठी भाषिक जोरदार स्वागत करणार आहेत. रवी साळुंके यांनी पहिल्या शो काही तिकिटं आरक्षित केली आहेत.ग्लोब मधील दुपारच्या शो ची काही तिकिटं युवा समितीने आरक्षित केली आहेत एकूणच बेळगावात उध्यापासून बाळासाहेबांना पहायला मिळणार आहे.