Thursday, May 23, 2024

/

‘रोनीत मोरे पुन्हा चमकला’

 belgaum

बेळगावचा उदयोन्मुख युवा गोलंदाज रोनीत मोरे यानें 83 धावांच्या मोबदल्यात घेतलेल्या 9 बळींच्या जोरावर कर्नाटकाने छत्तीसगड वर 198 धावांनी मात देत रणजी ट्रॉफीच्या नॉक आऊट राऊंड मध्ये आघाडी मिळवली आहे.

कर्नाटकाने छत्तीसगड संघा समोर 72 षटकात 355 धावांचे लक्ष दिले होते त्यावर छत्तीसगड सावध सुरुवात करत दोन गड्यांच्या मोबदल्यात 117 धावा केल्या होत्या मात्र त्यानंतर त्यांचा डाव गडगडला आणि केवळ 14.3 षटकात आठ गडी गमावले.

Ronit

 belgaum

रोनीत ने दुसऱ्या इनिंग मध्ये चार गडी बाद केले पूर्ण सामन्यात मिळून 83 धावांच्या मोबदल्यात 9 गडी बाद केले. रोनीत यालाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या रणजी हंगामात त्याने 27 बळी मिळवले असून सध्या तो फार्मात आहे. बेळगाव येथे देखील मागील महिन्यात झालेल्या रणजी सामन्यात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती.

स्कोर असा आहे
कर्नाटक: 418 आणि 219/7
छत्तीसगड: 283 आणि 156

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.