प्राणीमित्र गणेश दड्डीकर यांनी एक जखमी माकडास मदत केली आहे. बेळगाव येथील शास्त्रीनगर ५ वा क्राॅस येथे मारुती लोहार यांच्या घराच्या छतावर कालपासून दयनीय अवस्थेत एक माकड पडले होते, ही बाब त्यांना रात्री उशिरा लक्षात आली व लगेच त्यांनी त्या माकडाला पाणी व केळी खाऊ घातले आणि सकाळी शेजारी राहणाऱ्या शिवप्रसाद शेट्टी व एस पी एम रोड येथील सुर्यकांत शिंदे (कांता मामा ) याना कळविले.
ही बाब लागलीच या दोघांनी प्राणिमित्र गणेश दड्डीकर यांच्या निदर्शनास आणून दिली. ते घटना स्थळी पोचेपर्यंत ते माकड छतावरून खाली पडले होते, या दरम्यान त्याला विजेचा तीव्र धक्का बसला होता.
ही परिस्थिती पाहून दड्डीकर यांनी प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न केला व त्याच दरम्यान वनाधिकारी गिरप्पन्नवर यांना कळविले. घटनास्थळी वनाधिकारी आपल्या सहकाऱ्यां सह येऊन पुढील उपचारासाठी घेऊन गेले. या वेळी शिवप्रसाद शेट्टी व समाज सेवक गणेश दड्डीकर यांची मदत झाली.