Friday, March 29, 2024

/

बेळगावात रंगले शब्दविद्या शेकोटी कविसंमेलन

 belgaum

कवी हृदयमानव अशोक यांच्या शब्दविद्या कला साहित्य सांस्कृतिक युवा मंच महाराष्ट्र च्या
बेळगाव शाखा आयोजित पहिलं शेकोटी कविसंमेलन दिनांक १९ रोजी वाटवे कॉलनी, भवानी नगर, मंडोळी रोड, बेळगाव येथील बाडीवाले यांच्या एबीसी व्हॅली हॉटेलच्या लॉन वर पार पडले. यावेळी २५ कविंनी आपल्या दर्जेदार कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली..
यल्लापा पालकर यांनी चला सासरवाडीला ही कविता खास शैलित गाऊन रसिकांची दाद मिळविली.
“चला सासरवाडीला
फेटा बांधून जोडीला
सासू म्हणतेय माझा
जावई आला …अशी ती कविता होती.
आर.के.ठाकूरदेसाई नी आपल्या वेदनेचं दुःख या गजलेत
मांडलेल्या चांदण्यांचे केस होते मोकळे
मोजत गेलो पावले असेच केव्हातरी
हे ऐकवले.

भरत गावडे यांनी आग्रह मित्रांचा व पोटाची डेअरी या विंडबनेतून हास्याचा फवारा उडविला..
अजय पाटील या तोरगाळीच्या ग्रामीण युवा कविने समुद्र नावाच्या कवितेतून समुद्र किनाऱ्यावरील प्रेमांच्या आठवणीत रमणाऱ्या प्रियकराच्या मनाचा वेध कवितेतून घेतला.
रोशनी हुंद्रे नी आठवणीतला पाऊस ही कविता सादर केली.

Shekoti kvi
बहुभाषिक राधिका नवलगुंद यांनी कन्नड भावगीत गाऊन सुटका ही मराठी कविता सादर केली
प्रा. मनीषा नाडगौडा यांनी स्त्री जगण्याची विविधता अबला नही,सबला हूँ मै या कवितेतून मांडल्या ,
अक्षता येळूरकर यांनी तूच माझी आई या कवितेतून आईविषयची प्रेम भावना व्यक्त करणारी कविता सादर केली ,कोमल हुद्दार यांनी मुलगीलाच वंशाचा दिवा मानून तिला शिक्षण देऊन वाढवावे. तिच्या प्रतिभेला ओळखून घर आणि समाजाने योग्य सन्मान द्यावा ..तिला आपले जीवन घडविण्यासाठी प्रेरित करावे अशा आशयाची कविता सादर केली .
स्मिता किल्लेकर, स्वप्नील जोगाणी, संदिप मुतगेकर,भरमा कोलेकर यांनी कविता व चारोळी सादर केले.
संध्याकाळच्या रम्य वातावरणात चंद्र आणि ताऱ्यांच्या संगतीत,वाहत्या थंड हवेत पेटवलेल्या शेकोटी समोर हसत खेळत निसर्गाशी संवाद साधत हे बेळगावातील आगळे वेगळे कविसंमेलन पार पडले
किशोर काकडे यांच्या काव्यगायनानी कार्यक्रमाची सुरुवात झाली.राधिका नवलगुंद, श्रीमती गावडे, गीता कोलेकर व श्रेया पाटील यांनी अनेक गाणी गाऊन कार्यक्रमात रंगत आणली.
रसिकांनी या मैफिलीचा मनसोक्त आस्वाद घेतला .
शब्दविद्या बेळगावचे
सचिव संदीप मुतगेकर यांनी प्रास्ताविक केले आभार कार्याध्यक्ष स्वप्नील जोगानी यांनी मांडले.. आणि जिल्हाप्रमुख प्रा. भरमा कोलेकर यांनी शब्दविद्याच्या वेगवेगळ्या उपक्रमात युवा वर्गाने सामिल होऊन बेळगावात माय मराठीसाठी सहकार्य करण्याचे आव्हान केले…
या कार्यक्रमाला फेसबुक फ्रेंडस् सर्कल चे समाजसेवक संतोष दरेकर व तेजस कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले
दिपक किल्लेकर, रामनाथ नायक , आशा नायक तसेच इतर भवानी नगरातील रसिकांनी या शेकोटी संमेलनाचा लाभ घेतला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.