Friday, July 19, 2024

/

‘उद्धवजी अयोध्येपेक्षा सीमाप्रश्न महत्वाचा’

 belgaum

नमस्कार
मा. उद्धवजी ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख

साहेब,
बाळासाहेबांचे वारसदार म्हणून आजच्या परिस्थितीत आपणच आमचे हिंदुहृदयसम्राट आहात, आपल्याला त्रिवार अभिवादन. बाळासाहेबांची नक्कल करणारे तुम्ही नव्हे, आपण तर रक्ताचे वारसदार. पण आपण वेळीच शहाणे होत नाही ही आमची खंत आहे आणि ती तुमच्यासमोर मांडण्याचा आम्हाला पुरा अधिकार आहे असे आम्ही मानतो. म्हणून सांगतो उद्धवजी आज आयोध्ये पेक्षा सीमाप्रश्न महत्वाचा आहे.
तुम्हाला आठवत असेल ती कारसेवा आणि तीच बाबरी मशीद पाडवल्याची घटना. माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडवली असेल तर त्याचा मला अभिमान आहे असे म्हणणारे बाळासाहेब. आणि आठवत असतील तुम्हाला गोध्रा हत्याकांडाचे जळजळीत सत्याचे ते हाहाकारी प्रसंग. तुम्ही म्हणत असाल आठावायचे काय? मनामनात बसलेय हे सगळे. आज मोदी पंतप्रधान झाले त्याचे जनक तुमचे पिताश्री होते. हे आठवत असेल नसेल तर आठवा कारण आज ते न आठवत तुम्ही जी चूक करीत आहात त्याचे आम्हा सीमावासीयांना जास्त दुःख आहे.

udhav-thakrey
तुम्हाला मुंबई वाचवायची होती. तुमच्यामुळेच ती वाचली. पण तुम्ही हे जे करताय ते बाळासाहेबांनी भाजपसाठी यापूर्वी केलेय त्यापेक्षा फारच खुजे आहे आणि जे लोक बाळासाहेबांना कृतघ्न ठरले ते तुम्हाला कृतज्ञ ठरतील असे आम्हाला वाटत नाही.
गोपीनाथजी आज नाहीत. गडकरिजी असून उपयोगाचे नाहीत आणि फडनविसजी काहीच कामाचे नाहीत. अशावेळी तुम्ही तुमचे महत्व वाढवायचे असेल तर ती अयोध्या तुमचे महत्व वाढवणार नाही हे लक्षात ठेवा.
बहुतेक आम्ही लहान तोंडी मोठा घास घेतलाय. पण तुम्ही मोठे आहात हे मान्य करून, तेंव्हा नेभळट पणे असे वाहवत जाण्यापेक्षा जरा तो वाघ डरकाळी मारेल असे काहीतरी करा हीच विनंती.
नमस्कार
धन्यवाद
आणि प्रतीक्षेत
तुमच्या सीमाप्रश्नी खंबीर भूमिकेच्या
बाबरीच्या नव्हे….
आपला सीमावासीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.