दसरा सुट्टीत चित्रपटांची पर्वणी

0
 belgaum

नोकरदारांना दसऱ्याची जोडून आलेली सुट्टी आणि शाळांना सुट्टीचा काळ असल्याने चित्रपट वितरकांनीही चांगल्या चित्रपटांची संधी दिली आहे. काही नवीन चित्रपट आज गुरुवारीच प्रसिद्ध झाले असून उद्याही नवीन चित्रपट पर्वणी ठरतील अशी आशा चित्रपटगृह चालकांना आहे.

Cinema logo
प्रकाश आणि ग्लोब चित्रपटगृहांनी आजच बधाई हो बधाई हा नवीन चित्रपट रिलीज केला आहे. सानिया मल्होत्रा, आयुष्यमान खुराणा, गजराज राव आणि नीना गुप्ता अभिनित या चित्रपटाला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
प्रकाश मध्ये मागील तीन आठवड्यापासून बॉईज टू हा चित्रपट चांगला प्रतिसाद मिळवत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या तरुणाईला नादखुळा बनवणाऱ्या चित्रपटाला चांगली गर्दी होण्याची शक्यता आहे.
स्वरूप, बिग सिनेमा आणि आयनॉक्स येथे उद्या नमस्ते लंडन हा चित्रपट रिलीज होत आहे. अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा अभिनित हा चित्रपट आहे. स्वरूप मध्ये सायंकाळी ६.१५ व रात्री ९.३० ही वेळ असेल.
आज गुरुवारीच कन्नड प्रेक्षकांसाठी डी व्हिलन हा चित्रपट रिलीज झाला आहे. सुदीप आणि शिवराजकुमार हे दोन कन्नड सुपरस्टार या चित्रपटात असल्याने निर्मल, संतोष, चित्रा आणि स्वरूप या चार चित्रपट गृहिणी हा चित्रपट रिलीज केला आहे.
या पर्वणी मुळे दसऱ्याच्या सुट्टीत रसिक प्रेक्षकांची पावले आपसूकच या चित्रपटांकडे वळणार आहेत.

bg
bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.