Friday, March 29, 2024

/

‘बेळगाव लोकसभेसाठी दोघांत जोरदार लॉबिंग’

 belgaum

कर्नाटकात होऊ घातलेल्या तीन लोकसभा आणि दोन विधानसभा पोट निवडणुकांची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली असून त्या पाठोपाठ विविध राजकीय पक्षांनी आपल्या इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत त्यामुळं पोट निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापत चालले आहे.

काँग्रेस व निधर्मी जनता दलाचे संयुक्त उमेदवार व भाजपचा अधिकृत उमेदवार यांच्यात थेट लढत रंगण्याची शक्यता व्यक्त होत असताना 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारी जोरदारपणे आरंभली आहे.बेळगाव लोकसभा मतदार संघातुन कॉंग्रेसच्या वतीनं उमेदवार कोण असावा याची चाचपणी वरिष्ठां कडून केली जात आहे खरंतर भाजपला कडवी लढत देण्यासाठी काँग्रेसकडे योग्य उमेदवार नसल्याचे स्पष्ट दिसते अश्या स्थितीत काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार सतीश जारकिहोळी यांच्या नाव चर्चिले जात असले तरी एकंदरीत ते गोंधळल्याचे चित्र दिसते.

Congress_BJP_logo

 belgaum

बेळगाव लोकसभा मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या खासदार सुरेश अंगडी चौथ्यांदा भाजप कडून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे एकंदर बेळगाव मतदार संघाचा कानोसा घेतला असता गेल्या तीन टर्म मध्ये अंगडी यांच्या खात्यात कोणतेच भरीव काम केल्याचं दिसत नाही एकुणच त्यांच्या विकास कामा बद्दल जनतेत फारसं आशा दायक चित्रही दिसत नाही मात्र काँग्रेसलाअजूनही योग्य उमेदवार गवसला नसल्याने त्याचा फायदा पुन्हा भाजप होईल की काय अशी शक्यता नाकारता येत नाही.

बेळगाव लोकसभेच्या गेल्या तीन निवडणुकीत भाजपच्या सुरेश अंगडी यांच्या पारड्यात मराठी भाषिकांनी भरभरून मते दिल्याने ते विजयी होणे शक्य झाले त्यामुळं आताही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसतात.मराठी आणि लिंगायत मते घेणारा प्रबळ उमेदवार जर का काँग्रेसने दिला तर मात्र भाजपला जड जाणार आहे.जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी अलीकडेच आपले बंधू माजी मंत्री सतीश जारकीहोळी हे बेळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती मात्र त्यावर सतीश जारकीहोळी यांनी लागलीच आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आपण या संदर्भात अद्याप कोणताच निर्णय घेतला नसल्याचं सांगून अप्रत्यक्ष रित्या नकार दिल्याचे सूचित झाले होते.

भाजपने या खेपेला कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकातील 28 च्या 28 जागा जिंकण्याचे निर्धार केला आहे केंद्रात भाजपची सत्ता जर यायची झाल्यास कर्नाटकात अधिक जागा घेतल्यास ते शक्य होणार आहे.भाजप मधून अंगडी यांचं नाव निश्चित मानलं जातं असलं तरी ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील आणि राष्ट्रीय किसान मोर्चाचे शंकर गौडा पाटील यांनी दोघांनी जोरदार लॉबिंग करायला सुरुवात केली आहे.विद्यमान खासदार सुरेश अंगडी यांचे नाव जर मागे पडल्यास संजय पाटील यांच नाव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ते समर्थक मानले जातात सीमा भागातल्या मराठी भाषकांची मते घेऊ शकतो त्यामुळे संजय पाटील यांना कदाचित आर एस एस च्या कोट्यातून संधी मिळू शकते आणि संजय पाटील यांनी बैठका भेटी गाठी दिल्ली वाऱ्या करायला सुरुवात केली आहे.अलिकडेच संजय पाटील यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेऊन चाचपणी केल्याचेही कळते.

आर्टिकल सौजन्य -प्रशांत बर्डे -जेष्ठ पत्रकार बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.