जबेळगाव पासून १५ किमी अंतरावर असलेल्या कुद्रेमनी जवळील एक क्लबवर बेळगाव पोलिसांनी मोठी धाड टाकली आहे. बुधवारी सायंकाळी पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. मटका आणि जुगारात गुंतलेल्या ६० हुन अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बुधवारी सायंकाळी बेळगाव च्या डीसीपी सीमा लाटकर यांनी ही धाडसी कारवाई केली आहे. रिक्षातून पोलीस पथक दाखल दाखल झाले. हा क्लब सुरू असलेल्या ठिकाणी अचानक धाड मारण्यात आले आणि जुगाऱ्यांची धावपळ उडाली.
काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. याबद्दल सीमा लाटकर यांच्याशी संपर्क साधण्याचा बेळगाव live प्रयत्न करीत आहे.