Friday, April 26, 2024

/

‘मटका जुगार क्लब धाडीत लाखों रुपये जप्त’!

 belgaum

‘मटका जुगार क्लब धाडीत लाखों रुपये जप्त! ४० जुगारी आणि ४४ दुचाकी ,५ कार जप्त’

कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या कुद्रेमानी येथील जुगार व मटका अड्ड्यावर छापा टाकुन तब्बल ४० जुगाऱ्याना अटक केली असून त्यांच्या जवळील चार लाखांहुन अधिक रोख रक्कमेसह ४४ दुचाकी आणि ५ कार गाड्या जप्त केल्या आहेत.

Kudremani raid
पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या नेतृत्वाखाली ही धाड टाकण्यात आली होती. कुद्रेमानी गावच्या चारी बाजूनी महाराष्ट्र राज्याची हद्द आहे अशा ठिकाणी हा जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती मिळताच पोलीस खात्याने ही मोठी धाड टाकली आहे.
या धाडी साठी पोलीस खात्याने मोठी टीम तयार केली होती १५ जणांचे विशेष पथक नेमण्यात आले होते. या शिवाय कमालीची गुप्तता देखील पाळण्यात आली होती.काकती पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 belgaum

Seema latkar
दररोज सकाळी ७ ला सुरू होऊन हा क्लब रात्री उशिरापर्यंत सुरू राहत होता. ,या क्लब वर धाड टाकून सीमा लाटकर या वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मोठी कामगिरी केली आहे. सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.