Tuesday, April 23, 2024

/

सुरक्षा द्या: द्या चांगले रस्ते

 belgaum

वन्य जीवांपासून धोका आणि वनविभागाचे निर्बंध यामुळे संकटात सापडलेल्या खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा वन संरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. अरण्य विभागातील शेतांमध्ये जाण्यासाठी चांगले रस्ते आणि सुरक्षा द्या अशी मागणी त्यांनी केली.
भारती कृषक समाजाच्या झेंड्याखाली हे आंदोलन सोमवारी झाले. वन्यजीवांपासून संरक्षण द्या अशी मागणी करण्यात आली. मागील काही वर्षांत वन्यजीवांनी माणसावर हल्ले केल्याच्या घटना वाढल्या आहेत.या घटनांमध्ये अनेक माणसांचे प्राणही गमावले आहेत.अशा जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना किमान २५ लाख रुपये भरपाई देण्यात यावी तसेच त्या कुटुंबातील एक सदस्याला सरकारी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे आणि त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली.

Forestवन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीवर तो बरा होईपर्यंत सरकारने मोफत उपचार करावेत.अशी मागणीचे निवेदन दिले आहे. काहीवेळा वन्यजीवांनी हल्ला केलातर आपला जीव वाचवण्यासाठी माणसांना हत्यारे वापरावी लागतात. अशा घटनांवेळी वनविभाग शेतकऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून ठेवतो.असे प्रकार थांबवण्याची मागणी करण्यात आली.
वन्यजीवांनी पिकांचे नुकसान केले तर प्रति एकरला २५ हजार प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी. वन्यजीवांच्या मुक्त संचारासाठी बंडीपूर अभयारण्याप्रमाणे खानापूर तालुक्यातही विशेष कॉरिडॉर तयार करावेत अशीही मागणी करण्यात आली.
राज्य अध्यक्ष सिद्दगौडा मोदगी, संजय सुंठकर, सुनंदा इराप्पा कालीचे, महादेव नागप्पा गौडा यांच्यासह शेतकरी सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.