belgaum

आजकाल देवकीताईच्या पोटात सारखेच दुखायचे. जरा जेवणाला वेळ झाला की पोटात असह्य कळा सुरू व्हायच्या. पोट घट्ट लागायचे. ढेरा यायच्या वचित शौचास काळपट व्हायचे. देवकीताईचे वय वर्षे चाळीस. आर्थिक परिस्थिती बेताची आणि घरी प्रचंड मानसिक, शारीरिक ताण, त्यातच असा त्रास, सर्व उपचार झाले परंतु फरक नाही. एन्डोस्कोपी केल्यावर जठरव्रण म्हणून निदान झाले. मग त्यांनी होमिओपॅथीचा आधार घेतला. त्यांची मानसिकता व शारीरिक अवस्था समजून घेऊन उपचार केल्यानंतर चार महिन्यात त्या पूर्ण बर्‍या झाल्या.

अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे असा आपल्या पचनसंस्थेचा मार्ग आहे. त्यापैकी जठर, लहान आतड्याच्या प्रथम भागावर किंवा आद्यांत्र (आतड्याचा प्रथम भाग) यांच्या आतील थराला व्रण पडतात किंवा जखम होते. या आजाराला पेप्टिक अल्सर अर्थात जाठर व्रण म्हणतात. जठारातल अल्सरला ’गॅस्ट्रिक अल्सर’  आणि आद्यांत्राच्या अल्सरला ’डिओडेनिल अल्सर’ म्हणतात. बहुतेक वेळा हे दोन्ही अल्सर एकत्रितरित्या पेप्टिक अल्सर म्हणून ओळखले जातात.Peptic alcerकारणे व लक्षणे- जाठरव्रणाची लक्षणे तीव्र व वेदनामय असतत. पोटाच्या वरच्या भागात खूप दुखते. जाठरव्रणामुळे होणार्‍या वेदना जेवणानंतर एक तासाने किंवा कधी कधी रात्री सुरू होतात. तर आद्यांत्रव्रणामुळे दोन जेवणाच्या मधे पोट रिकामे असताना दुखू लागते. खाल्ल्यानंरत विशेषतः दूध प्यायल्यानंतर बरे वाटू लागते.

जसजसा आजार वाढू लागतो, तसतसा पोटात वात धरतो व पोट फुगते, मानसिक ताण वाढतो, झोप येत नाही, थकवा वाटू लागतो. मलावाटे रक्त्तही पडते. (शौचास काळपट होणे) पोटातील अतिरिक्त्त आम्लामुळे पेप्टिक अल्सर होतो. जठराच्या अतील अस्तरातील पेशींंतून हायड्रोक्लोरिक आम्ल पाझरते. या आम्लाचे प्रमाण वाढले की जठराच्या आतील स्तरावर त्याचा वाईट परिणाम होतो. गरजेपेक्षा जास्त खाणे, मसालेदार पदाथ्र, कॉफी, चहा, मद्य, धुम्रपान या चुकीच्या सवयींनी जाठरव्रणाचा आजार होतो. त्याबरोबरच काही विशिष्ट औषधे घेतल्याने अन्नातून विषबाधा किंवा विविध जंतूंचा संसर्ग झाल्यामुळे, मानसिक असंतुलन, ताणतणाव, दडपण या कारणांनीही जाठरव्रण होतात.

उपचार- निसर्गोपचार- जाठरव्रणावर एक पेला दूध व दोन केळी रोज घेतल्याने तीव्रता कमी होते. शेवग्याची पाने (10 ग्रॅम) वाटून दह्यात मिसळून खावी. दोन कप पाण्यात कवठाची 15 ग्रॅम पाने रात्रभर भिजत ठेवावी, सकाळी हे पाणी गाळून प्यावे. कवठाच्या मऊ मगजापासून केलेले सरबतही गुणकारी आहे. शेळीचे निरसे दूध दिवसातून एक दोन पेले प्याल्याने व्रण बरे होण्यास मदत होते.

बाराक्षार- नॅट्रम फॉस 6 हे औषध पेप्टिक अल्सरवर उपयुक्त आहे. चहा, कॉफी इत्यादीची सवय, बध्दकोष्ठता, भूक न लागणे, स्निग्ध पदार्थांच्या सेवनाने अजीर्ण किंवा अस्वास्थ असल्यास ’काली मूर’ ने बरे वाटते. बध्दकोष्ठता, आंत्रदाह, जाठरव्रण, वांती, तोंडाला पाणी येणे, घशात पातळ कफ येणे यावर नॅट्रम मूर या औषधाने बरे वाटते.

योग- अतिरिक्त आम्ल व जाठव्रण यांच्यावर उपाय म्हणून रोज वज्रासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, पश्‍चिमोत्तासन ही आसने करावीत. चिंता व्यथांवर विजय मिळवून आनंदी राहण्यासाठी प्राणायाम, ध्यान करावे. काम, व्यायाम, विश्रांती यात नियमितपणा ठेवला पाहिजे.

होमिओपॅथी- वरील सर्व उपचारांमुळे विकारांची तीव्रता कमी होते. परंतु पूर्ण बरे होण्यासाठी होमिओपॅथीचीच मदत घ्यावी लागते. होमिओपॅथीक तज्ज्ञांकडून उपचार घेतल्यास रोग पूर्ण बरा होतो. नंतर पूर्ण निरोगी अवस्थेत राहण्यासाठी निसर्ग, योग व आहारावर लक्ष देणे अपरिहार्य आहे.

उदा. पोटात जळजळते तरीही चमचमीत खावेसे वाटते. कोरड्या ढेकरा येणे, काळपट रंगाची उलटी होणे, पोटात सारखे दुखणे यावर फॉस्फरस हे होमिओपॅथीक औषध उपयुक्त्त आहे. पोटफुगी, पोटात गुरगुरल्या सारखा आवाज येणे, खाणे झाल्यावर पोटात दुखणे यावर अ‍ॅसिड नायट्रीकम हे औषध खास आहे. अर्सेनिक अल्बम, कार्बोवेज, अ‍ॅसिड सल्फ, लायकोपोडियम, असाफिटीडा अशी अनेक औषधे जाठरव्रणांवर उपयोगी आहेत.Dr sonali sarnobatसंपर्क
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक – ९९१६१०६८९६
सरनोबत क्लिनिक- ९९६४९४६९१८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.