Thursday, April 25, 2024

/

रशियन पॅटर्नच्या स्वेटर्सची बेळगावात निर्मिती

 belgaum

अत्यंत अवघड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियन विणकाम पद्धतीचा अभ्यास करून बेळगावच्या आशा पत्रावळी यांनी दोनशेहून अधिक स्वेटर्स तयार करून कौतुकास पात्र ठरल्या आहेत.विशेष म्हणजे रशियन भाषेचा कोणताही गंध नसताना इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांनी रशियन पद्धतीची माहिती घेऊन स्वेटर विणण्याचे कष्टसाध्य तंत्र स्वतः विकसित केले आहे.सध्या त्यांनी रशियन पॅटर्नचे लहान मुलांची दोनशेहून विविध प्रकारची स्वेटर्स दोन वर्षे अखंड परिश्रम घेऊन तयार केली आहेत.आज पत्रकार परिषदेत त्यांनी रशियन पॅटर्नच्या स्वेटर्सची माहिती दिली.

Swaters

रशियन पॅटर्नमध्ये अँब्रेला फ्रॉक,बेबी फ्रॉक,शाल,पोचो आणि साधे स्वेटर तयार केले आहेत.बेळगावातच नव्हे तर इतरत्रही रशियन पॅटर्नची स्वेटर कोणीही तयार केलेली नाहीत.कोणाचेही मार्गदर्शन न घेता मी स्वतः स्वेटर तयार केली आहेत.रशियन पॅटर्नची स्वेटर्स केलेत याची माहिती मिळाल्यावर विणकाम क्षेत्रातील अभ्यासू महिलांनी माझे फोन करून कौतुक केले.रशियन पॅटर्नच्या स्वेटर्सची माहिती केवळ रशियन भाषेत असते.रशियन विणकाम सोपे नाही असे कौतुक केल्याची माहितीही आशा पत्रावळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 belgaum

 

केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या आशा पत्रावळींची विणकाम विषयावरील सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.आजपर्यंत त्यांनी पाच हजारहून अधिक निरनिराळी स्वेटर्स तयार केली आहेत.कार्टून,अँग्री बर्डस,उशा,केटरपिलर,टोप्या,नेकलेस असे विविध प्रकार लोकरीच्या विणकामाने केली आहेत.त्यांच्या कार्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे.पंधराहून अधिक पुरस्कार त्यांना लाभले आहेत.कॉलेजमधील विद्यार्थिनींना त्यांनी हॉबी क्लासद्वारे मार्गदर्शन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.