Thursday, December 5, 2024

/

बेळगावात इंदिरा कॅन्टीनची सुरुवात 

 belgaum

कर्नाटक सरकारने गरीब लोकांकरीता अनेक चांगल्या योजना लागु केल्या आहेत. आता इंदीरा कॅँन्टीनच्या माध्यमातून गरीब व मध्यमवर्गीयांना कमी दरात नाष्टा व जेवण उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले. किल्ला भाजी मार्केट जवळील इंदीरा कँन्टीनचे सोमवारी पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर बसाप्पा चिक्‍कलदिनी, आमदार फिरोज सेठ, मनपा आयुक्‍त शशिधर कुरेर, पोलिस आयुक्‍त राजप्पा, जिल्हाधिकारी जिया उल्हा, उपमहापौर मधुश्री पुजारी आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर काही वेळ नागरीकांना कँन्टीनमध्ये मोफत चहा, उपीट व पुलाव याचे वितरण करण्यात आले.

INdira canteen

सकाळचा नाष्टा 5 रुपयांत तर दुपारचे जेवण 10 रुपयांत उपलब्ध होणार आहे. प्रत्येक दिवस नाष्टा व जेवणात वेगवेगळा मेनु असणारा आहे. तांदळापासीन बनविलेले पदार्थ जास्त प्रमाणात मिळणार असून बेळगाव जिल्ह्यात पहील्या टप्पात 15 इंदीरा कॅँन्टीन सुरु करण्यात येणार आहेत. किल्ला भाजी मार्केटसह एपिएमसी आवार, जिल्हा रुग्नालय, केएमएफ, गोवावेस, नाथ पै सर्कल व आझमनगर परीसरात लवकरच इंदीरा कॅँन्टीन सुरु करण्यात येणार आहे. जिल्हामध्ये गोकाक, अथनी, बैलहोंगल, चिक्‍कोडी, रामदुर्ग, सौंदत्ती, हुक्‍केरी खानापुर व रायबाग येथे प्रत्येकी एक इंदीरा कॅँन्टीन सुरु करण्याकरीता काम सुरु आहे. सर्व कॅँन्टीन मार्च महिण्याच्या शेवटच्या आठवडयापर्यंत सुरु होतील. अशी माहिती यावेळी देण्यात आली. धान्य व इतर खर्चाकरीता महानगर पालिका व्याप्तीमधील इंदीला कॅँन्टीनला 6 कोटी 24 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

 

इंदीला कॅँन्टीनमध्ये इंटरलॉक सुविधेसह, विज पुरवठा, पाण्याची सुविधा, 4 वॉश बेसिन, 3 हॅँन्ड वॉश बेसिन, जेवन करण्यासाठी 7 टेबल, यासह जेष्ठ नागरीकांसाठी स्वतंत्र सुविधा असून सकाळ पासून रात्रीपर्यंत दररोज 500 लोकांना कमी दरात जेवण मिळणार आहे, 100 ते 300 ग्रॅम इतका नाष्टा तर 200 ते 300 ग्रॅम इतक्‍या प्रमाणात जेवण मिळणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.