अबुधाबी येथे अटक झालेल्या आनंद कामकर( रा. वडगाव) याचे पालक अजूनही त्याची सुटका झाले की नाही याची माहिती मिळाली नसल्याने त्याच्या प्रतिक्षेतच आहेत. शाबिया पोलीस स्थानकाने त्याला ७ फेब्रुवारीला अटक केली असून भारतीय दूतावासानजीक फोटो काढल्यावरून त्याला अटक झाली आहे.
त्याच्या पालकांनी थेट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट करून आपल्या मुलाची सुटका करा अशी मागणी केली होती.मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आता त्याचे वडील अबुधाबीला जाण्याच्या तयारीत आहेत.
आजवर त्याच्यात आणि त्याच्या कुटूंबियात काहिच संपर्क झालेला नाही. यामुळे काळजीत वाढ झाली आहे.
मात्र आनंद च्या फेसबुक अकौंट वर आपण सुरक्षित असून काहीही ट्विट करू नका माझ्या ट्रिप वर परिणाम होऊ शकतो असे पोस्ट आल्याने गोंधळात आणखीनच भर पडली आहे.
आनंद ला अजून कोर्टात हजर करण्यात आलेले नाही यामुळे त्याला वकिली मदतही देत येऊ शकत नाही, अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.