Thursday, May 2, 2024

/

कविता ही आयुष्यभराची जोखीम           -कवी चंद्रकांत पोतदार

 belgaum

मंथनाच्या अवस्थेत सर्जन आणि सृजनाच्याअवस्था समजून घ्या कवितेची निर्मिती करताना प्रतिमा,प्रतिभा,संवेदना आणि  भवताल सूक्ष्मपणे नजरेतून साठवा असे मत कवी चंद्रकांत पोतदार  यांनी मांडले.


एल्गार सामाजिक साहित्य परिषद पुणे शाखा बेळगाव यांच्या वतीने  वांगमय चर्चा मंडळात बागेतल्या कविता या कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्षस्थानी अशोक याळगी होते
वेदना आणि संवेदना यांची सांगड हवी,तरच काळजाला भिडणारी कविता निर्माण होईल. शब्दसंपती हीच कवितेची साधना होय असेही ते म्हणाले.
साहित्य टिकले तर मराठी टिकेल आणि टिकणारच  बेळगाव महाराष्ट्राचेच यात काहीही दुमत नाही असं मत एल्गार साहित्य परिषदेचे कॉम्रेड महेंद्रकुमार गायकवाड यांनी मांडले.

या कवी संमेलनाचे उदघाटन भाजप नेत्या तेजस्विनी धाकलुचे यांनी केले. यावेळी शिल्पा कुलकर्णी(पुणे)विश्वनाथ साठे(बुलढाणा)पूजा भडांगे(बेळगाव) आदित्य दवणे(मुंबई) आत्माराम हारे, आनंद गायकवाड(पुणे)यांनी कविता म्हटल्या.यावेळी शेकडो कवी रसिकांनी कविता ऐकल्या.

 belgaum
 belgaum

1 COMMENT

  1. आपल्या सहकार्याने मराठि माणसांना अधिकार मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.